Gen-Z च्या समस्यांना मिळणार व्यासपीठ! मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे ‘Garba & Gossip’ कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सूचना फलकावर तरुणांनी मांडले आपल्या समस्या आणि प्रश्न; Gen-Z च्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध .. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांचे आश्वासन
कल्याण : Gen-Z च्या देशभरातील आंदोलनानंतर सर्वच राजकिय पक्षांनी Gen-Z समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तरुणाईला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातील प्रश्न मांडण्यासाठी आणि भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे कल्याण मध्ये ‘Garba & Gossip’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला Gen-Z तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात केवळ गरबा आणि मनोरंजनापुरते मर्यादित न राहता तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, अडचणी आणि अपेक्षांनाही म�
Kalyan, Thane | Oct 23, 2026