२०१९ पासून कारवाईचा केवळ फार्स? डोंबिवलीच्या सोनारापाड्यातील कथित बेकायदा लॉजिंगवर KDMC प्रशासनाची टाळाटाळ!
लोकायुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई रखडली; २०२१ मध्ये बांधकाम बेकायदा ठरवून नोटीस बजावली, तरी प्रश्न अनुत्तरित — जागामालक जयवंत पाटील यांचा संतप्त सवाल
कल्याण : कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील सोनारापाडा परिसरात कल्याण-शीळ रस्त्यालगत सुरू असलेल्या ‘आर्या लॉजिंग बोर्डिंग’च्या कथित बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपल्या मालकीच्या जागेवर कब्जा करून हे लॉजिंग बोर्डिंग चालविले जात असल्याचा दावा जागामालक जयवंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून २०१९ पासून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
लोकायुक्तांचे आदेश, तरीही कारवाई नाही!
जयवंत पाटील यांनी या प्रकरणी सर्वप्रथम लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त�
Kalyan, Thane | Oct 23, 2026