डोंबिवलीत पार्सल डिलिव्हरी ब्लिंकिट रायडरवर दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला, रायडर जखमी
‘शिवी का दिली ? अशी विचारणा केली असता आधी कानाखाली मारली, त्यानंतर पुन्हा हल्ला केल्याचा आरोप
डोंबिवली : डोंबिवलीत ब्लिंकिट कंपनीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करणाऱ्या दिनेश मारुती कंक यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याचे दिनेश कंक यांनी सांगितले. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर डोंबिवलीतील शिवम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिनेश मारुती कंक हे ब्लँकेट कंपनीमध्ये रायडर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ते चोळेगावातून पार्सल डिलिव्हरी करून एमआयडीसीच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांना शिवी दिली . काही अंतरावर दिनेश कांती यांना तो �
Kalyan, Thane | Oct 22, 2026