Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Pm
Uttarpradesh
Haryana
Crimenews
Aap
Pakistan
Asaduddinowaisi
Breaking
Politics
jilhavarta
कल्याणमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला आलिशान मर्सिडीजची धडक; तरुणाचा जागेवरच मृत्यू,हिट अँड रण प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी CCTVच्या आधारे कार जप्त करत कार चालक ओमील गायकरला घेतलं ताब्यात; आलिशान गाडीवरील ‘विधानसभा सदस्य’ स्टिकरमुळे चर्चा!
Kalyan, Thane
| Oct 23, 2026
MORE NEWS
Gen-Z च्या समस्यांना मिळणार व्यासपीठ! मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे ‘Garba & Gossip’ कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सूचना फलकावर तरुणांनी मांडले आपल्या समस्या आणि प्रश्न; Gen-Z च्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध .. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांचे आश्वासन कल्याण : Gen-Z च्या देशभरातील आंदोलनानंतर सर्वच राजकिय पक्षांनी Gen-Z समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तरुणाईला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातील प्रश्न मांडण्यासाठी आणि भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे कल्याण मध्ये ‘Garba & Gossip’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला Gen-Z तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात केवळ गरबा आणि मनोरंजनापुरते मर्यादित न राहता तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, अडचणी आणि अपेक्षांनाही म�
Kalyan, Thane | Oct 23, 2026
Gen-Z ना व्यासपीठ! मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे ‘Garba & Gossip’ कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,विविध वेशभूषा करत तरुण तरुणी सहभागी, बक्षिसांची लयलूट
Kalyan, Thane | Oct 23, 2026
२०१९ पासून कारवाईचा केवळ फार्स? डोंबिवलीच्या सोनारापाड्यातील कथित बेकायदा लॉजिंगवर KDMC प्रशासनाची टाळाटाळ! लोकायुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई रखडली; २०२१ मध्ये बांधकाम बेकायदा ठरवून नोटीस बजावली, तरी प्रश्न अनुत्तरित — जागामालक जयवंत पाटील यांचा संतप्त सवाल कल्याण : कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील सोनारापाडा परिसरात कल्याण-शीळ रस्त्यालगत सुरू असलेल्या ‘आर्या लॉजिंग बोर्डिंग’च्या कथित बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपल्या मालकीच्या जागेवर कब्जा करून हे लॉजिंग बोर्डिंग चालविले जात असल्याचा दावा जागामालक जयवंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून २०१९ पासून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. लोकायुक्तांचे आदेश, तरीही कारवाई नाही! जयवंत पाटील यांनी या प्रकरणी सर्वप्रथम लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त�
Kalyan, Thane | Oct 23, 2026
Kalyan, Thane | Oct 23, 2026
कल्याण स्टेशन परिसरात ‘CHAI CHOWK’चा शानदार शुभारंभ; अभिनेता रिषभ कश्यप गोलू यांच्या हस्ते उद्घाटन! चहा प्रेमींसाठी पर्वणी! चहासोबत सँडविच आणि मोजिटोचीही मेजवानी; कल्याणकरांच्या भेटीला नवा चहाचा अड्डा कल्याण : चहाचा आस्वाद घेणाऱ्या शौकिनांसाठी कल्याणमध्ये एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कल्याण स्टेशन परिसरात ‘CHAI CHOWK’ या नव्या चहा आउटलेटचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता रिषभ कश्यप उर्फ गोलू यांच्या हस्ते करण्यात आले. चहा प्रेमींसाठी खास आकर्षण ठरणाऱ्या या आउटलेटमध्ये चहासोबतच सँडविच आणि मोजिटोसारख्या पेयांचाही आस्वाद घेता येणार आहे. चहाचा आनंद घेण्यासाठी तसेच मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण कल्याणकरांसाठी एक नवा पर्याय ठरणार आहे. अभिनेता रिषभ कश्यप गोलू यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे या नव्या उपक्रमाला विशेष रंगत आली. चहा, खाद्यपदार्थ आणि पेयांची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी ‘CHAI CHOWK’ कितपत लोकप्रिय ठरते, याकडे आता कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
Kalyan, Thane | Oct 23, 2026
लोकनेते पुंडलिकशेठ म्हात्रे कामगार संघटनेचे युनियन तर्फे KDMC ला निवेदन सुमित एलको कंपनीच्या कामगाराना दिवाळी पूर्वी बोनस द्या ..कामगारांच्या इतर मागण्यांसाठी KDMC उपायुक्त रामदास कोकरे यांना निवेदन
Kalyan, Thane | Oct 23, 2026
Kalyan, Thane | Oct 23, 2026
डोंबिवलीत पार्सल डिलिव्हरी ब्लिंकिट रायडरवर दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला, रायडर जखमी ‘शिवी का दिली ? अशी विचारणा केली असता आधी कानाखाली मारली, त्यानंतर पुन्हा हल्ला केल्याचा आरोप डोंबिवली : डोंबिवलीत ब्लिंकिट कंपनीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करणाऱ्या दिनेश मारुती कंक यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याचे दिनेश कंक यांनी सांगितले. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर डोंबिवलीतील शिवम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिनेश मारुती कंक हे ब्लँकेट कंपनीमध्ये रायडर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ते चोळेगावातून पार्सल डिलिव्हरी करून एमआयडीसीच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांना शिवी दिली . काही अंतरावर दिनेश कांती यांना तो �
Kalyan, Thane | Oct 22, 2026