उमरेड: माजी आमदार सुधीर पारवेंकडून शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलनस्थळी भेट
Umred, Nagpur | Sep 30, 2026 माजी आमदार सुधीर पारवे यांनी संविधान चौकात जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी, पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ आणि रखडलेल्या शाळांच्या अनुदानाबाबत तातडीने कार्यवाही करावी, यासाठी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्याशी चर्चा केली.