कोपर रेल्वे स्थानकाच्या समस्यांवर ‘रेल जन संवाद’
दिवा-वसई लोकल फेऱ्या वाढवण्यासह प्लॅटफॉर्मवर शेड, पिण्याचे पाणी, सरकते जिने आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची मागणी; नगरसेविका ज्योती पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे मांडले प्रश्न
डोंबिवली : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील सात हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ उपक्रम राबविण्यात आला. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
कोपर रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत भाजपच्या नगरसेविका ज्योती पवन पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी आणि नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्थानकावरील समस्यांची माहिती असलेले अर्ज रेल्वे प्रबंधक संजय गुप्ता यां
Kalyan, Thane | Oct 22, 2026