सावनेर: शिक्षणमंत्री यांनी जिल्हा परिषद विद्यालय चणकापूर शाळेची केली पाहणी
Savner, Nagpur | Sep 9, 2026 महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.श्री.दादा भुसे साहेब यांनी जिल्हा परिषद विद्यालय चनकापूर शाळेची पाहणी केली यावेळी त्यांनी शाळेला चक्क तीन तासांचा वेळ दिला राज्याच्या शिक्षण मंत्र्याने एखाद्या शाळेला एवढी वेळ देने म्हणजे गौरवाची बाब आहे यावरून शिक्षणमंत्री साहेबांच्या कार्याची कल्पना करता येते. याप्रसंगी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न खापरखेडा पत्रकार संघाने शिक्षणमंत्री मा.श्री.दादा भुसे साहेब यांच्या कार्याची प्रशंसा केली शिवाय त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.