कळमेश्वर: JSW कॉलनी ते रेल्वे गेटदरम्यान अपघात; दोन जखमी ग्रामीण रुग्णालयात दाखल
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी रोडवरील JSW कॉलनी ते रेल्वे गेटच्या मधात अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले.या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्तांची नावे :पार्थ गुणवंत नागपुरे रा. लोणारा अमित बिमलेश धाकड रा. गुना, मध्य प्रदेश ही आहेत