कळमेश्वर: जय भवानी जय शिवाजी उद्घोषाने दुमदुमली कळमेश्वर नगरी
आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी तळ्याची पार कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शिव स्वराज्य मित्र मंडळ कळमेश्वर ब्राम्हणी च्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. येथे नागरिकांनी जय भवानी जय शिवाजी या उद्घोषाने सर्व वातावरण शिवमय झालेलं होतं