कामठी: कामठी येथे गुरुनानक जयंती अनुषंगाने काढण्यात आली भव्य शोभायात्रा
सिख धर्मियांचे पहिले गुरु, गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथे आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रद्धा आणि भक्तीभावाने ही शोभायात्रा काटी ओली येथील श्रीराम सिंधू भवन येथून सुरू झाली.या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता. भाविक 'वाहेगुरू'चा जयघोष करत होते. तसेच, या दरम्यान शबद-कीर्तन सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.