Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

श्रीवर्धन: श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

Shrivardhan, Raigad | Jan 5, 2026
मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर एक मोठं कासव वाहून आले आहे असा तिथे काम करणाऱ्या आकाश सुरेश पाडलेकर रा.वेळास यांनी वनविभाग कांदळवन कक्ष दक्षिण कोकण यांचे कार्यालयास संपर्क केला असता कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांचे अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ञ, कासव मित्र यांनी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी जाऊन पाहिले असता ते ग्रीन सीटर्टल या प्रजातीचे नरकासव आहे. रायगड जिल्हयात सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात त्या अनुषंगाने या प्रजातीचा त्यात समावेश आहे परंतु आज मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांच्यानिदर्शनास आले.
श्रीवर्धन: श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव - Shrivardhan News