श्रीवर्धन तालुक्यातील गडब वाडी गावालगत बॉक्साईडचे उत्खनन सुरु आहे. यामुळे गावातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत, धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर सुरूंगाच्या हदऱ्याने घरांना देखील धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्या मांडत आज गडब वाडी ग्रामस्थांनी उत्खनन ठिकाणी आंदोलन केले. या वेळी आंदोलक ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.