श्रीवर्धन: श्रीवर्धन येथे महायुतीच्या विजयी मिरवणूक रॅलीत खासदार सुनील तटकरे यांचा सहभाग
नगरपरिषद / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या निकालानंतर आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास श्रीवर्धन येथे आयोजित राष्ट्रवादी-महायुतीच्या विजयी मिरवणूक रॅलीत खासदार सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी श्रीवर्धन येथील श्री सोमजादेवी देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेतले. या विजयी रॅलीच्या निमित्ताने श्रीवर्धन नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करणाऱ्या श्रीवर्धनच्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. या पुढील काळातही श्रीवर्धनच्या भवितव्यासाठी विकासाचा दृष्टीकोन कायम ठेवून सकारात्मक पद्धतीने कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास यानिमित्ताने जनतेला दिला.