श्रीवर्धन: श्रीवर्धन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
श्रीवर्धन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर मी आपणा सर्वांना आवाहन करते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळे श्रीवर्धनच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. या विकासकामांची अखंडता टिकवण्यासाठी आणि शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम व अनुभवी नेतृत्वाची गरज आहे.आपल्या श्रीवर्धन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार कटिबद्ध आहेत, ते नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यास तत्पर आहेत. असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र प्रभाकर सातनाक यांना घड्याळ चिन्हावर तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना घड्याळ व कमळ चिन्हावर आपले अमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करा.