श्रीवर्धन शहरातील समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुणे येथून आलेल्या एका पर्यटकाच्या थार गाडीने दुचाकीस्वाराला जोरदार ठोकर दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.पुणे येथून आलेल्या काळ्या रंगाच्या एका थार गाडीने श्रीवर्धन येथील व्यावसायिक परवेज हमदुले हे आपल्या स्कुटीवरून घरी जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांनी चुकीच्या बाजूनी गाडी चालवून त्यांना जोरदार ठोकर दिली व गाडी जवळ जवळ 40 फूट फरफटत पुढे नेली.