आज मंगळवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे भरडखोल व परिसरातील मच्छीमार बांधवांच्या समस्या, तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने आज बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीस खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, मत्स्यआयुक्त किशोर तावडे, मच्छिमार नेते हरिओम चौघुले - सरपंच भरडखोल यांच्यासह संबंधित अधिकारी व मच्छीमार बांधव उपस्थित होते.