जाफराबाद: बोरगाव म. शेत शिवारात शेतात लावलेला गांजा पोलिसांनी केला जप्त
आज दिनांक 20 ऑक्टोबर 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम राबवत बोरगाव मठ शिवारात गट क्रमांक 128 मध्ये विजय मुळे यांच्या शेतात मोठी कारवाई केली आहे. शेतामध्ये बेकायदेशीरपणे लागवड केलेली 6 किलो वजनाची गांजाची 17झाडे पोलिसांनी जप्त केली असून, या कारवाईत 3लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पो. नि. सतीश जाधव यांनी दिली आहे.