रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पक्षप्रवेशांची मालिका वेगाने सुरू असून, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी विभागात उबाठा पक्षाला मोठा धक्का दिला आहे. कोंढवी विभागातील उबाठाचे विभागप्रमुख नितीन रघुनाथ मोरे आणि गोळेगणी गावचे उपसरपंच शेखर येरूणकर तसेच प्रकाश गोपाळ येरूणकर, प्रमोद भोसले, साईनाथ येरूणकर, दिपक मोरे, अन्य असंख्य कार्यकर्त्यांसह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत तसेच रायगड जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.