Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील कापडे ( बु.)येथे भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न

Poladpur, Raigad | Feb 2, 2026
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील कापडे (बु.) जिल्हा परिषद गटाचे शिवसेना–शेकाप युतीचे अधिकृत उमेदवार डॉ. निलेश कुंभार, कापडे (बु.) पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अनिल दळवी तसेच माटवण पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार साक्षी कांबळेकर यांच्या प्रचारार्थ कापडे ( बु.)येथे भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेदरम्यान देवळे गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाग प्रमुख आनंदभाऊ केसरकर, वैभव केसरकर, मदन जामदार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह, तसेच कापडे (खु.) गावचे भरत जामदार व चांभारगणी गावचे ग्रामपंचायत सदस्य सतीश अशोक गोळे यांनी ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत माझ्या नेतृत्वात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे विभागात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली आहे.