कळमेश्वर: तातडीच्या आव्हानाला यश! सोशल मीडियामुळे अज्ञात व्यक्तीची ओळख पटली
11 सप्टेंबर रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे ५५ वर्षांची एक अज्ञात व्यक्ती आढळून आल्याची माहिती समोर आली होती. सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद मिळून सदर व्यक्तीचे नाव रामभाऊ ढोमणे, रा. तिगाव, पांढुर्णा असल्याची माहिती समोर आली आहे.