फौजी अंबवडे येथील ग्रामपंचायत सदस्य रेश्मा प्रवीण जाधव यांनी ग्रामस्थांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने आज फौजी अंबवडे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ रेश्मा प्रवीण जाधव यांनी ग्रामस्थांसह मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या विकासात्मक कार्यप्रणाली वरती विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत झाली आहे. यावेळी विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.