शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वात आज महाड येथे चोचींदे गावचे उबाठा गटातील महाड पंचायत समितीचे माजी सभापती वसंत बटावले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसंत बटावले यांच्या प्रवेशामुळे या विभागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. असा मला विश्वास आहे. या पक्षप्रवेशाप्रसंगी महाड तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.