पोलादपूर: कुडपणमध्ये पावसाचा कहर; रस्ता खचल्याने एसटी वाहतूक ठप्प
पोलादपूर तालुक्यातील कुडपण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून कुडपण-पोलादपूर एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुडपण खुर्द येथे रस्ता खचल्यामुळे एसटी बस पुढे जाऊ शकली नाही आणि ती तेथेच अडकून उभी आहे. संततधार आणि मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याची झालेली गंभीर अवस्था आणि वाहतूक बंद झाल्यामुळे गावाचा संपर्क विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.