डोंबिवलीतील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; विष्णुनगर पोलिसांची धडक कारवाई!
जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाची हत्या; तिघांना अटक, दोन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या खून प्रकरणाचा विष्णुनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान गुन्हेगारी मध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग हा चिंतेचा विषय ठरला आहे . मयत साहिल गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे
Kalyan, Thane | Oct 22, 2026