कळमेश्वर: येरला येथे बैलपोळा उत्साहात साजरा,नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
शेतकऱ्यांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला बैलपोळा सण येरला येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावातील शेतकरी आपल्या बैलांना सजविण्याच्या तयारीत व्यस्त होते. बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग देण्यात आला. तसेच आकर्षक झूल, गोंडे, फुलांच्या माळा व विविध सजावटींनी बैलांना सजविण्यात आले. त्यानंतर शेतकरी कुटुंबांनी बैलांची विधिवत पूजा करून औक्षण केले व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.