डोंबिवली, निळजे आणि लोधा हेवनच्या नागरी समस्यांवर भाजप आक्रमक
रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक प्रश्नांवर तातडीच्या कारवाईची व संयुक्त पाहणीची मागणी
लोधा हेवन, निळजे-डोंबिवली पूर्व आणि परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा यांनी KDMC आयुक्तांना निवेदन दिले आहे. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वाढीव वीजबिल, अतिक्रमण, मध्यवर्ती पुलाजवळील बाजार आणि वाहतूक कोंडी या प्रश्नांवर तातडीने संयुक्त पाहणी करून वेळबद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून काय काय समस्या आहे ? ह्याची संपूर्ण माहिती घेऊन समस्या सोडवण्याचा काम करणार असल्याचे सांगितले.
Kalyan, Thane | Sep 10, 2026