उमरेड: शंकर पटाचा शौक पडला भारी, आणि आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Umred, Nagpur | Oct 6, 2026 उमरेडमधील 'शारदा फॅशन मॉल'चे शटर तोडून ५४,५०० रुपयांची चोरी करण्यात आली होती.स्वप्नील जनार्दन मेश्राम (वय २५, रा. मंगरमेंढा, ता. सावली, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. उमरेड पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला जेरीस आणत १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल (चोरीची रोकड, दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य) जप्त केला आहे. आरोपीला 'शंभरपटाचा शौक' असल्यामुळे तो कर्जबारी झाला होता, आणि त्याने हिंगणघाट येथेही एका टेक्सटाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली आहे.