बदनापूर: अकोला निकळक येथे मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी केली पवित्र नमाज अदा
Badnapur, Jalna | Sep 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक येथे मुस्लिम समाज बांधवांनी दर्ग्यावर शेकडोच्या संख्येने एकत्र येत पवित्र नमाज अदा केली आहे ,याचे कारण म्हणजे मागील दीड महिन्यापासून जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाचा थेंबही पडला नाही, त्यामुळे शेतकरी पूर्णतः हदबल झाला असून ,डबघाईला आला आहे, या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी या मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत नमाज अदा करत पावसासाठी एकतेचा संदेश देत नमाज अदा केली आहे.