सावनेर: के जॉन पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्याला सर्प दंश
Savner, Nagpur | Sep 1, 2026 शहरापासून काही अंतरावर असलेल्या खापा रोडवर असलेल्या केजॉन पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात विद्यार्थ्यांची आई सुनिता घनश्याम कटारे यांनी 28 ऑगस्ट रोजी सावनेर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज सादर केला आहे