सावनेर: सावनेर मध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Savner, Nagpur | Sep 7, 2026 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सावनेर विभागात बाह्य स्त्रोतामार्फत कंत्राटी रेखाकर्मी म्हणून कार्यरत असलेल्या मुकेश चिंतामण मस्के यांच्याविरुद्ध नागपूर लास्ट प्रतिबंधक विभागाने आज सोमवार दिनांक सात सप्टेंबर रोजी नियोजनबद्ध कारवाई केली खाजगी कामाच्या मोबदल्यात नियमबाह्य अतिरक्त रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे