महाड: कुर्ला धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली वाहून
Mahad, Raigad | Jul 7, 2026 महाड नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या कुर्ला धरणातून महाड शहराकडे येणाऱ्या सावित्री नदी पात्रातील जलवाहिनी पुराच्या पाण्याने वाहून गेली. यामुळे दक्षिण महाड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भीषण पाणीटंचाईला भर पावसात समोर जावे लागणार आहे. या संदर्भात नदीपात्रात गाळ काढण्याच्या प्रसंगी घडलेल्या घटनांच्या विरोधात नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडे याबाबतची योग्य उपाय योजना करावी अशी मागणी केली होती.