हिंगणा: हिंगण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; २ लाखांहून अधिकचा अवैध दारूसाठा जप्त
Hingna, Nagpur | Sep 8, 2026 8 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चंद्रपूर रेठी गाव येथे छापा मार कार्यवाही करून १७०० लिटर मोह फुलाचा सडवा आणि १८० लिटर हातभट्टी दारू असा एकूण किंमत २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर श्रीराम मारोडी यासह इतर तीनफरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हे शाखा युनिट ०१ च्या पथकाने हिंगणा हद्दीतील चंद्रपूर रेठी गावात छापा टाकून मोह फुलाची हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई केली. घटना