हिंगणा: मोहगाव झिल्पी रोडवर कारच्या धडकेत वृद्ध महिला जख्मी
Hingna, Nagpur | Feb 12, 2026 मोहगांव झील्पी रोड येथे गणेश ट्रेडींग कंपनी नावाचे हार्डवेअर चे दुकान समोर सुभद्राबाई रामाजी नानोरे, वय ८० वर्षे, रा. धनगरपुरा नगर ह्या उभ्या असतांना, कार चालक हर्षल नंदलाल सिंग, वय २४ वर्षे याने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगाने,चालवुन सुभद्राबाई यांना गंभीर जखमी केलं जखमावर उपचार सुरू आहे. आरोपी चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद हिंगणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.