उमरेड: उमरेड एमआयडीसीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपी अटक, ६ गुन्हे उघड
Umred, Nagpur | Oct 7, 2026 उमरेड एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा उमरेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणत एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.