रामटेक: नप शाळेच्या विद्यार्थ्यांची नगरपरिषद कार्यालय रामटेकला क्षेत्रभेट
Ramtek, Nagpur | Sep 15, 2026 क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत स्व. विठ्ठलराव हटवार नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामटेकच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह नगरपरिषद कार्यालय रामटेक येथे जाऊन नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची भेट घेऊन प्रशासकीय व्यवस्था, विविध विभागांचे कार्य कार्यपद्धतीची माहिती घेतली. पंधरा सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान या क्षेत्रभेटीची आयोजन करण्यात आले होते.