बदनापूर: बदनापूर तहसील कार्यालयावर कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने केले आंदोलन
Badnapur, Jalna | Sep 18, 2026 आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते व तालुका अध्यक्ष खाजेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत हातात खरिपात सुकलेली पिके घेऊन आंदोलन केले आहे या त्यांनी तहसीलदारा मार्फत निवेदन देऊन सरकारकडे मागणी केली आहे की सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा कारण पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे त्यामुळे सरकारने याची तात्काळ दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.