हिंगणा: शाळा देखील आता कुठे सुरक्षित? अमर नगर येथील जिल्हा परिषद शाळेत झाली चोरी
Hingna, Nagpur | Sep 9, 2026 9 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील अहमदनगर येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने कडीकोंडा तोडून शाळेत प्रवेश केला आणि साहित्य चोरून नेले. एरवी घरामध्ये ऑफिसमध्ये चोरी होण्याच्या घटना घडत होत्या परंतु आता चक्क शाळेत चोरी झाल्याची घटना घडल्यामुळे अमर नगर वासिय दहशतीत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.