कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी बैलपोळा उत्साहात साजरा,पारंपरिक वेशभूषेत शेतकरी; सजवलेल्या बैलजोड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
कळमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची विधिवत पूजा केली.