कळमेश्वर: कळमेश्वर नगर परिषद शाळेतील मदतनीस कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत!
कळमेश्वर नगर परिषद शाळेतील मदतनीस कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुख मंगेश गमे यांनी कळमेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केली.