सावनेर: विदर्भात अंजिर शेतीची यशोगाथा ,दोन एकरातून 7 ते 8 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
Savner, Nagpur | Sep 1, 2026 पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक व नाविन्यपूर्ण शेतीचा उपयोग केल्यास विदर्भाच्या मातीतही चांगले उत्पादन घेता येते हे सावनेर तालुक्यातील कवडस येथील शेतकरी सुनील ठाकरे यांनी आपल्या अंजीर लागवडीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखविले आहे सुनील ठाकरे यांनी सुमारे एक वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन बेड पद्धती आणि प्लास्टिक मॅचिंग चा वापर करून डायना या अंजीरवानाची लागवड केली. दोन एकर क्षेत्रातून सुमारे सात ते आठ लाख रुपयाचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे