कामठी: नवीन कामठी पोलिसांची कारवाई: डॉक्टरांकडे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक
Kamptee, Nagpur | Aug 24, 2026 पोलिस ठाणे नवीन कामठी हद्दीतील रनाळा रोड येथील 'सिटी हॉस्पिटल'चे संचालक तथा फिर्यादी डॉ. तन्जीम आजमी यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीस नवीन कामठी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.आरोपी गुलाम नझर शेख मोहम्मद याची प्रकृती बरी नसल्याने तो उपचारासाठी डॉ. तन्जीम यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आला होता. फिर्यादीने त्याचा मोफत उपचार करून त्याला घरी पाठवले होते.