बदनापूर: रोशनगाव,पानखेडा,ठोकसाळ येथे शेतकऱ्यांचे जनावरे महावितरणचे तारे चोरणारे6चोरटे पोलिसांच्या ताब्यात,लाखोंचा मुद्देमाल जप्त
Badnapur, Jalna | Aug 29, 2026 आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवशे व त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून धडाकेबाज कारवाई केली आहे, तालुक्यातील काजळा पानखेडा ठोकसाळ रोशनगाव या परिसरात शेतकऱ्यांची जनावरे महावितरण ची तारे विद्युत मोटारी चोरणारे सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल 8लाख 14 हजार व 12 लाखाच्या पिकप असा एकूण 20 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे.