बदनापूर: शेलगाव सह बदनापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंतरवालीत जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल
Badnapur, Jalna | Aug 31, 2026 आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील शेलगाव दाभाडी यासह शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटी येथे दाखल झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे,जरांगे पाटील समाजासाठी आमरण उपोषण करत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने हे मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे दाखल झाल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.