सावनेर: खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चार वर्षापासून पडलेला दारूसाठा अखेर नष्ट
Savner, Nagpur | Sep 4, 2026 विविध गुन्ह्यात जप्त करून चार वर्षापासून पोलिस ठाण्यात मालखान्यात ठेवण्यात आलेला 1 लाख 29 हजार 160 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा अखेर नष्ट करण्यात आला.न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून परवानगी घेतल्यानंतर खापरखेडा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.