
डोंबिवलीत धक्कादायक घटना!
खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीनंतर तरुणीची आत्महत्या?,मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक
डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर एका तरुणीचा लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत तरुणही फिजिओथेरपीस्टच्या शिक्षण घेत होती या प्रकरणी सुमित खवळे या तरुणाला मानपाडा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपी सुमित खवळे हे मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील रहिवासी होते. दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीला हे संबंध पुढे सुरू ठेवायचे नव्हते. आरोपानुसार, याच कारणावरून सुमित खवळे हा तरुणीला तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता.या पार्श्वभूमीवर दोघेही डोंबिवलीतील एका लॉजमध्ये आले होते. त्यानंतर तरुणीने गळफास घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे याला अटक केली. त्यानंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे
.
Kalyan, Thane | Oct 23, 2026