कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील 27 पर्यटक बेपत्ता?
डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचाही समावेश; मुलाकडून शोध सुरू
काल दुपारनंतर संपर्क तुटल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण
कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातील 27 पर्यटक 23 ऑगस्टला नेपाळला रवाना झाले होते
‘हिल्स अँड ट्रेल्स’च्या माध्यमातून गेलेल्या संपूर्ण ग्रुपशी काल दुपारनंतर संपर्क तुटला
डोंबिवलीतील रहिवासी सुनील सुभेदारही या ग्रुपमध्ये; ते देखील सध्या संपर्काबाहेर
सुनील सुभेदार यांचा मुलगा स्वानंदकडून वडिलांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू
नेपाळ प्रशासन आणि भारतीय दूतावासाशी कुटुंबीयांचा संपर्क; मदतीसाठी मुंबईतील संस्था व राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी
एका पर्यटकाचे काल सकाळी नातेवाईकांशी शेवटचे बोलणे; इमिग्रेशनसाठी जात असल्याचे सांगितले होते
Kalyan, Thane | Aug 28, 2026