कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले कल्याण-डोंबिवलीतील ३ जण बेपत्ता!
तीन दिवसांपासून संपर्क तुटल्याने कुटुंबीय चिंतेत
पाटील दाम्पत्याच्या सुरक्षित परतीसाठी शेजाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू
कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेल्या कल्याण-डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी नलिनी पाटील, तसेच डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, पाटील दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीतील शेजाऱ्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी शेजाऱ्यांनी भावनिक आवाहन केले आहे.
Byte:-संजय पाटील यांचे शेजारी 1,2,3
Kalyan, Thane | Aug 28, 2026