कुडाळ: आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या सचिन धुरीला कुडाळ पोलिसांनी केली अटक
कुडाळ मालवण मतदारसंघातील आमदार निलेश राणेंवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ठाकरे सेनेच्या शाखाप्रमुख सचिन धुरी याला कुडाळ पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तक्रार करून जबाब मागितला.