रामटेक: रामटेक येथे बिनविषारी दुर्मिळ नानेटी
अल्बिनो (पांढऱ्या ) सापाचे सुरक्षित रेस्क्यू
Ramtek, Nagpur | Aug 23, 2026 रामटेक शहरात प्रथमच बिनविषारी दुर्मिळ नानेटी अल्बिनो (पांढरा) साप राधाकृष्णन वार्ड रामटेक येथील सादिक अली कुतुबी यांचे घर परिसरात आढळून आल्याने वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेकच्या सर्पमित्र प्राणिमित्रात कुतूहल निर्माण झाले होते. दुर्मिळ साप दिसल्याची माहिती होताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले व कुशलतेने सुरक्षितपणे सापाचे रेस्क्यू करण्यात आले.