रामटेक: गड मंदिर परिसरात बिबट चा वावर ; लहान गडपायरी परिसरात घेतला कुत्र्याचा बळी
Ramtek, Nagpur | Aug 20, 2026 गड मंदिर रामटेक परिसरात बिबट चा वावर अद्यापही कायम असल्याने परिसरात दहशतपूर्ण वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी पिपरीया पेठ रामटेक परिसरात बिबट्याने मध्यरात्री एका बकरीला ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वीस ऑगस्टला रात्री सात वाजताच्या दरम्यान छोट्या गडपायरी परिसरात बिबट ने एका कुत्र्याची शिकार केल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे.